सुजय विखेंच्या दक्षिण वारीच्या स्वप्नामुळे कारखाना वार्यावर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कारखान्याच्या चेअरमन या जबाबदार पदावर असताना देखील सुजय विखे कारखाना सोडून दक्षिणेत पूर्ण वेळ देत आहेत. कारखान्याचे कर्मचारी दक्षिणेत पाठवले जात आहेत. पगार कारखान्याचा आणि काम मात्र सुजय यांच्या प्रचाराचे, त्यातही चार महिने पगार नाही. पगाराची वर्गवारीही अत्यल्प सहकारात कामगार कायम होतील म्हणून अपेक्षा लावून बसतात नको ते काम करतात पर्मनंट  झाले तर कल्याण होईल. या अपेक्षेने कामाला सुरुवात 3000 रुपयांनी करतात.मात्र त्याचे स्वप्न स्वप्नच राहत आहेत.

कामगार केवळ राजकारणाचे बळी ठरताहेत निवडणूक काळात तर कामगारांना विरोधकांशी बोलायला सुद्धा परवानगी नसते.कामगार हे  सहकारी आहेत. का विखेंचे  खासगी हाच प्रश्न पडतो. मात्र याचे विखेंना कोणतेच त्याच सोइरसुतक नाही. कारखान्यात आतापर्यंत अनेक अपघात झाले अनेकांचे बळी गेले मात्र कोणाला न्याय मिळाल्याची बातमी कधी कानावर आलीच नाही. इतर प्रकरणात प्रसिद्धीसाठी तमाशा करणारी ही मंडळी मृत कर्मचाऱ्यांचे नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यात कधीच पुढे आले नाहीत.किती अन्याय सामान्य जनतेने सहन करायचा हाच प्रश्न आहे.आणि या विषयावर कोणीच का बोलत नाही.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.