विखे पाटील साहेब,घर उपाशी असताना गावजेवण कशासाठी ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातच अनेक प्रश्न आहेत जे त्यांना मार्गी लावता आलेले नाहीत, आता त्यांचे पुत्र सुजय विखे नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत.राहता मतदारसंघ उपाशी असताना म्हणजे घर उपाशी असताना गाव जेवण कशासाठी अशी भावना शिर्डी मतदारसंघात आणि प्रवरा परिसरात उत्पन्न होत आहे.

विखेंकडून घर उपाशी आणि गाव तुपाशी असे घाणेरडे राजकारण होत असल्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर चालू आहे, राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या पदावर विराजमान असलेले राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे चिरंजीव यांनी राजकारणात सीमोल्लंघन केल्याच्या चर्चेला सध्या जिल्ह्यात उधाण आले आहे. दक्षिण नगरच्या खासदारकीचा मोह डोक्यात घुसल्याने आणि त्यासाठी सुरू असलेली उठाठेव पाहता शिर्डी विधानसभा मतदार संघातील जनता मात्र नाराज आहे. आणि विखे कुटुंब मात्र यापासून अनभिज्ञ आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.