संगमनेरात तलवारी, चाकू सह तिघांना अटक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील विठ्ठल मंदीराच्या पाठिमागे व लक्ष्मीनगर या दोन ठिकाणी छापा टाकत तिघा जणांकडून चाकू, जंब्या, मोटारसायकल, तलवार अशी घातक हत्यारे जप्त केल्याची घटना रविवार दि.२० मे रोजी पहाटे चार व दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील विठ्ठल मंदीराच्या पाठिमागे जालिंदर नवनाथ बर्डे (रा.जाफ्राबाद,नांदूर, ता.श्रीरामपूर) व सुनील संजय खुडसाने (रा.वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर) या दोघा जणांकडे पल्सर मोटारसायकल क्रमांक एमएच १४ सीआर ७७५४ व तलवार असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांना समजली होती.

त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या दोघांनाही पकडले आहे. तर रविवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी परिसरातील लक्ष्मीनगर येथील निलेश देविदास मोहारे याच्याही घरी पोलिसांनी छापा टाकला असता तर त्याच्याकडे विनापरवाना चाकू व जंब्या अशी घातक हत्यारे मिळून आले आहेत. या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.