राहाता तालुक्‍यात दोघांना मारहाण करत 25 हजारांची लूट


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वैजापूर येथील बेकरी व्यावसायिकांची गाडी अडवून मारहाण करत 25 हजार रुपयेव मोबाइल हिसकावून नेण्यात आला. ही घटना राहाता तालुक्‍यात अस्तगाव येथे शुक्रवारी रात्री आठ वाजता घडली.

वैजापूर येथील साबेर हकीम शहा हेबेकरी व्यावसायिक माल विक्रीसाठी शुक्रवारी लोणीवरून राहात्याकडे येत होते. अस्तगाव शिवारात भनसाळी फार्महाऊस समोर रात्री 8 च्या सुमारास पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील तीन व्यक्‍तींनी टाटा गाडी क्रमांक एम. एच.20 – डी. ई. 3748 ला मोटारसायकल आडवी घातली. साबेर शहा व त्यांचा भाऊ हकीम यास वाहनातून दोघांनी बाहेर ओढत मारहाण केली. खिशातील पैसे व वाहनातील पैशाची बॅग हिसकावून घेऊन त्यांनी पोबारा केला.

साबेर शहा यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला. राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 दिवसातील ही तिसरी घटनाआहे. पहिली घटना चितळी रोडवर घडली. द्राक्ष व्यापाऱ्यास मारहाण करून लुटण्यात आलेहोते. त्यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील बाकीचे आरोपी फरार आहेत. दुसरी घटना चार दिवसापुर्वी एकरूखे परिसरात घडली. त्यातील आरोपी कोल्हार परिसरात रस्ता लुटीच्या तयारीत असताना लोणी पोलिसांनी पकडले. त्या गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.