गोपीनाथ मुंडे यांच्या टंचाईमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आता साकार झाले- आ.शिवाजी कर्डिले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राज्य शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त अभियान योजनेला आता पाणी फाउंडेशनची साथ मिळाल्याने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या टंचाईमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आता साकार झाले आहे, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. 


नगर तालुक्यातील कौडगाव (जांब) येथे पाणी फाउंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून गावामधील हजारो ग्रामस्थ श्रमदानासाठी एकवटले आहेत. रविवारी आ. कर्डिले यांच्यासह युवानेते अक्षय कर्डिले, पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे, वाघेश्वरी दूध संघाचे अध्यक्ष दीपक लांडगे, माजी जि.प. सदस्या अलकनंदा खर्से, मेहेकरीचे सरपंच संतोष पालवे, कौडगावचे सरपंच पैलवान धनंजय खर्से, उपसरपंच सुपेकर, माजी उपसरपंच बाळासाहेब बिबे, रमेश शिंगाडे, ॲड संदीप भोगाडे, मीना गाढवे, हेमा कांडेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठया संख्येने या श्रमदानामध्ये सहभागी झाले होते.

श्रमदानासाठी आलेल्या आ. कर्डिले यांचे कौडगावकरांनी जोरदार स्वागत केले. या वेळी आ. कर्डिले यांच्यासह उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदान केले. त्यानंतर झालेल्या घोंगडी बैठकीमध्ये आ. कर्डिले म्हणाले, नगर तालुक्यातील कौडगाव आणि मांजरसुंबा दोन गावांचे पाणी फाउंडेशनचे काम चांगले असून, विकासकामामध्ये गटतटबाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे.

राज्यात अकरा हजार गावे जलयुक्तमध्ये घेतलेले असून, या कामामुळे प्रत्येक जिल्ह्यांतील टँकरची संख्या मोठया प्रमाणात घटली आहे. कौडगावकरांच्या उत्सफूर्त प्रतिसादामुळे या गावचा निश्चितच कायापालट होईल. मीदेखील सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे आ. कर्डिले या वेळी म्हणाले. कौडगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये बोरवेल खोदण्यास पूर्णपणे बंदी केल्याच्या निर्णयाचे आ. कर्डिले यांनी स्वागत केले. प्रास्ताविक बाळासाहेब बिबे यांनी केले. किरण गावडे यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.