अकोल्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  सध्या सुर्य आग ओकत आहे. ४० अंश डिग्री सेल्सीअसच्या पुढे तापमान गेले असून सुरेश बाबुराव वाजे या ४५ वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथे घडली.याबाबत माहिती अशी की, मयत सुरेश वाजे हे शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भर दुपारी आपल्या शेतात पाणी भरत असताना चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर त्यांच्यावर बहिरवाडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.