श्रीगोंदेतील सिद्धार्थनगरमध्ये घरात लपवलेली तलवार जप्त

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शनिवारी रात्री पेट्रोलिंगदरम्यान श्रीगोंदेतील सिद्धार्थनगर परिसरात सुखदेव पुनाराम चौधरी (महादजी शिंदे महाविद्यालयामागे, होळीगल्ली) याच्या घरातील पोटमाळ्यावर पोत्यात लपवून ठेवलेली गंजलेली तलवार पोलिसांनी जप्त केली. 


पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी ही कारवाई केली. चौधरी यास पुढील तपासासाठी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मढेवडगाव येथील एकाकडून ७०० रुपये किमतीची अडीच फूट लांबीची तलवार हस्तगत करण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल संभाजी वाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
                                                    -------------------------------
Powered by Blogger.