विखे पिता-पुत्रांसह तरुणाई झिंगाट !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लेक वाचवा अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवात संगीतकार अजय अतुल यांच्यासह इतर कलाकारांच्या अदाकरीचा नगरकरांनी शनिवारी रात्री आनंद लुटला. कर्तृत्ववान महीलांच्या सन्मानासह जनसेवा फौंडेशन आणि कलाकारांनी लाखो रसिक प्रेक्षकांना दिलेला बेटी बचावचा संदेश या कार्यक्रमाचे वेगळेपण ठरले. 

अजय-अतुल यांच्या प्रसिद्ध 'झिंग झिंग झिंगाट' गाण्यावर डॉ. विखे यांनी कसलेला नृत्याविष्कार सादर केला. व्यासपीठावर त्यांनी नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. या दरम्यान वडील राधाकृष्ण विखे स्टेजवर आल्यावर त्यांचाही हात धरून त्यांना ताल धरायला लावला. त्यांनी दोन्ही हात वर करीत थोडावेळ नृत्य केले. पण डॉ. विखेंसह अन्य कलावंतांचे नृत्य सुरूच होते. ते पाहून प्रेक्षकांतीलही अनेकांनी स्वतःची नाचण्याची हौस भागवून घेतली. लहान मुले-मुली व महिलाही यात मागे नव्हत्या. या गाण्याला वन्समोअर घेत तब्बल १५ ते २० मिनिटे सारे स्टेडियम नृत्योत्सवात दंग झाले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.