डॉ सुजय विखेंच्या सांस्कृतिक महोत्सवात मान्यवरांचे हाल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :डॉ. सुजय विखे यांनी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शनिवारी सायंकाळी वाडिया पार्क मैदानावर नगर सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अजय व अतुल यांच्या मैफलीचे आयोजन केले होते.नाशिक पासून ते जामखेडपर्यंत सर्वांना मोफत पासेस वाटल्यामुळे कार्यक्रमाला अलोट गर्दी पहायला मिळाली.


वाडिया पार्कमधील या मैफलीसाठी जिल्हाभरातून मान्यवरांना बोलावण्यात आले होते. त्यांना 'व्हीआयपी' पासही दिले गेले होते. पण त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासच अडचण आली. वाडिया पार्कच्या इम्पिरियल चौकातील दरवाजातून आत सोडलेल्या मान्यवरांना पुढे जाऊच दिले जात नव्हते. काळ्या कपड्यांतील बाऊंन्सर मंडळींची अरेरावी सुरू होती. 

अखेर चिडलेल्या मान्यवरांनी सरळ रेटारेटी करीत स्टेडियमच्या जिन्याखालील बोळीतून कसाबसा आत प्रवेश मिळवला. लहान मुले व महिलांचे यात खूप हाल झाले. कार्यक्रम सुरू असताना सोशल मीडियावरही हा विषय़ चर्चेत होता. गाण्यांवर नाचता नाचता काही जण महिलांच्या कक्षात घुसून नृत्ये करू लागल्याने डॉ. विखेंनी कार्यक्रम थांबवला आणि सर्वांना खडे बोल सुनावले. त्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.