भाजपच्या कार्यक्रमात आ.शिवाजीराव कर्डिले अनुपस्थित !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार अनिकेत पाटील यांची आढावा बैठक रविवारी भाजपचे नूतन संघटनमंत्री पुराणिक यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला जिल्ह्यातील भाजपचे , पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे,आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह सर्व पदाधिकारी हजर होते.आमदार शिवाजी कर्डिले मात्र अनुपस्थित होते. तीन आमदार, एक कॅबिनेट मंत्री व एक खासदार, एक माजी खासदार, एक माजी आमदार या दिग्गजांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाजिरवाणी होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.