माजीमंत्री बबनराव पाचपुते भाजपच्या कारभारावर नाराज.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मंत्रीमंडळातील मंत्री लोकांमध्ये फिरत नाहीत. केंद्रीय मंत्री जिल्ह्यात येतात, मात्र राज्यातील मंत्री कधी जिल्ह्यात फिरकलेले दिसले नाहीत. सामान्य कार्यकर्त्यांना मंत्री भेट देत नाहीत. प्रदेशाध्यक्षही भेटत नाहीत. कार्यकर्त्यांचे ऐकूनही घेत नाहीत. ते नेहमीच संपर्काच्या बाहेर असतात,हे काही पक्षाच्या दृष्टिने चांगले लक्षण नाही.प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला वेळ नाही. त्यामुळे सरकार आणि पक्षातील शिस्त बिघडली आहे, अशी टीका करीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपला घरचा आहेर दिला.

नगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार अनिकेत पाटील यांची आढावा बैठक रविवारी भाजपचे नूतन संघटनमंत्री पुराणिक यांच्या उपस्थितीत झाली. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे,आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह पदाधिकारी हजर होते.

या कार्यक्रमात पाचपुते यांनी मनातील खदखदच व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना पाचपुते बोलत होते. रविवारी सावेडीत झालेल्या या मेळाव्यात पाचपुते यांनी स्वपक्षातील बेशिस्तीवरच हल्लाबोल केल्याने कार्यकर्त्यांनीही डोळे विस्फारले.

उत्तरेकडील संस्कृती... 
आपल्याकडे उत्तरेकडील संस्कृती आल्याचा खोचक टोला सुजय विखे यांना नाव न घेता माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी लगावला. खासदार गांधी यांचा चेहरा आज खुश दिसतो आहे. रात्रीचा कार्यक्रम तुम्ही पाहिला का? असे पाचपुते यांनी खासदार गांधी यांना यावेळी विचारले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.