पारनेर तालुक्यातील गोरेगाव -भाळवणी रस्ता बनला मृत्यूचा सापळा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील गोरेगाव भाळवणीमार्गे नगर रोडवरील गोरेगाव ते भाळवणी या रस्त्याची अत्यंत्य दुर्दशा झाल्याने रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून साईडपट्टया भरून घ्याव्यात, अशी मागणी वाहन चालकाशह प्रवाशांनी केली आहे. 


रस्त्याच्या कडेच्या साईडपट्टया यावर्षी वारंवार झालेल्या पावसाने वाहून गेल्याने खड्डयात वाहने आदतात. यामुळे अनेकांना पाठीचे आज़ार ज़डले आहेत. माळकूपवरून गोरेगावकडे जाणाऱ्या उतारावरच्या रस्त्याच्या कडेचा भाग पूर्णपणे वाहून गेल्याने ठाणगे वस्तीजवळील अर्धा किलोमीटर रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे. रोडवरून एक वाहन चालणे अवघड आहे.

दोन्ही बाजूच्या साईडपट्टयांऐवज़ी खड्डे असल्याने समोरून वाहन आल्यास अडचण निर्माण होते. या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याचे काचरदास ठाणगे यांनी सांगितले. गोरेगावसह कान्हूर, किन्ही, बहिरोबची वाडी, तिखोल, पाडळी, काळकूप, माळकूप या गावांतील प्रवाशी, विद्यार्थी, शेतकऱ्यांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच वाहनांची मोठी वर्दळ असते.

एकेरी रस्ता समोरासमोर दोन वाहने आल्यास रास्ता वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. अशावेळी वाहन पलटी होऊन वाहनाचे नुकसान होते. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून साईडपट्टया भरून घ्याव्यात, अशी मागणी वाहन चालकांसह रवी पातारे व गोरेगाव ग्रामपंचायत सदस्य वामन चौरे,यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.