जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न : खासदार गांधी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भाजपने गुंडगिरी व दहशतीला कधीच प्रोत्साहित केलेले नाही. परंतू व्यक्तिगत कारणाने झालेल्या घटनांमुळे काही लोक संपूर्ण जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत अाहेत. चुकीच्या पद्धतीने जिल्ह्याचे वर्णन केले जात आहे, असा आरोप खासदार दिलीप गांधी यांनी केला.पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील आंधळेवस्ती येथे कोपरे, हनुमानटाकळी, जवखेडे खालसा, जवखेडेदुमाला येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी खासदार गांधी आले होते.

खासदार गांधी म्हणाले, कोपरेगावासह इतर तीनही गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाचे नाव लागलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकांबरोबच सेवा संस्थाकडूनही कर्ज घेता येत नाही. कोपरे धरण होण्याअगोदर ज्या शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यापोटी शासनाकडून पैसे मिळाले.

ते पैसे परत करण्याची तयारी संबंधित शेतकऱ्यांना ठेवावी लागणार आहे. दरम्यान, खासदार गांधींच्या रूपाने जवखेडे गावात तब्बल ४० वर्षांनी खासदाराचे पाय लागले. यामुळे ग्रामस्थही भारावून गेले. खासदार गांधीनी या गावाला भरभरुन निधी देण्याचे जाहीर केले.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव चोरमले, राहुल कारखेले, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, अनिल पालवे, अमोल गर्जे, सरपंच अमोल वाघ, वसंत पोटे, प्रकाश वाघ, प्रा. संजय आव्हाड, बबनराव आंधळे, बाळासाहेब भोसले, दगडू आंधळे, रमेश आव्हाड, मच्छिंद्र लांघे, महेमूद पठाण, अजिंक्य आंधळे, आदिनाथ कासार उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.