श्रीगोंदा शहर विकासासाठी गट-तट विसरून सर्वांनी एकत्र यावे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :३३ कोटी खर्च करून १७ रस्ते रुंद झाल्याने शहराला आकार आला आहे. रस्ता रुंदीकरणामध्ये कोणीही राजकारण न करता वैयक्तिक हितासाठी प्रशासनास वेठीस धरू नये. शहराच्या विकासासाठी गट-तट व राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केले.


शहरातील पंतनगर येथील रस्त्याचे भूमिपूजन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाले. यावेळी शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहिती नगराध्यक्ष पोटे यांनी दिली. ते म्हणाले, श्रीगोंदे शहराला जोडणाऱ्या १७ रस्त्यांसाठी नगरपरिषदेस ३३ कोटींचा निधी पाचपुते यांच्या विशेष प्रयत्नांतून मिळाला. सर्व कामे प्रगतिपथावर आहेत.

रस्ते सुंदर व प्रशस्त होत असल्याने शहराच्या वैभवात भर पडत आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वांनी याकामी एकत्र यावे. स्वहित व राजकारण बाजूला ठेवून गावाचे खऱ्या अर्थाने शहरात रूपांतर करण्यासाठी सर्वांचा हातभार लागावा. या रस्त्यांच्या कामावर आधारित पुढे नगरपरिषदेस मोठा निधी उपलब्ध होणार आहे.

शहरासाठी वरदान ठरलेल्या घोड धरणावरून आलेल्या नळयोजनेचे नवीन जोड देण्याचे काम सुरू आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पोटे यांनी सांगितले. यावेळी पोपटराव खेतमाळीस, सुनीता शिंदे, सतीश मखरे, सुनील वाळके, डॉ. सुवर्णा होले, जयश्री कोथिंबिरे, जे. डी. अनभुले, प्रतापराव देशमुख, गणेश भोस, शुभांगी लगड, विजय मुथ्था, प्राचार्य बी. टी. मखरे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.