श्रीगोंद्यात महिलेस विजेचा शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :इलेक्ट्रिक मोटरीच्या स्टार्टर मधील वायर काढून खाली सोडून महिलेस विजेचा शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न तालुक्यातील भावडी येथे घडला. याप्रकरणी महिला शेतकरी साक्षी श्रीकांत भोस यांच्या फिर्यादी वरून दोघांच्या विरोधात श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. 



साक्षी या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील कृषिपंप चालू करण्यासाठी गेल्या असता सुनील सर्जेराव भोस, सुधीर भोस यांनी संगनमत करून या विहिरीवरील कृषी पंपाला वीज पुरवठा करणारे स्टार्टर मधील वायर काढून खाली टाकल्या होत्या या वायर मधील विदयुत प्रवास लावून इजा, दुखापत होईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. याच वेळी साक्षी भोस या विहिरीवर गेल्याने सुदैवाने त्यांनी या खुल्या वायर पाहिल्याने दुर्घटना घडली नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.