अनिल राठोड यांनी केडगाव हत्याकांडाला राजकीय वळण दिले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगाव हत्याकांड, त्यानंतर झालेली दगडफेक, रास्ता रोको, पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड या सर्व घटनाक्रमांचा शिवसेनेने पुरेपूर राजकीय वापर केला. त्यासाठी त्यांच्या पक्षातील मंत्रिमहोदयांनी साथ दिली. एवढेच नाही, तर गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांवर वेगवेगळे आक्षेप घेण्यात आले. मात्र, हेच आक्षेप शिवसेनेच्या अंगलट आले. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी या हत्याकांडाला राजकीय वळण दिले. दगडफेक प्रकरणी अटक करू नये, यासाठी पोलिसांवर दबाव आणत तपास यंत्रणेवरच संशय घेण्यात आला. त्यामुळेच या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा, असा अहवाल पोलिस प्रशासनाने गृह विभागाला पाठवला. त्यास मंजुरी मिळून गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. या अहवालामुळे शिवसेनेचे पितळ उघडे पडले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.