आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या प्रयत्नांवर पाणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगाव हत्याकांडाचे आयते कोलीत मिळाल्याने त्याचा पुरेपूर राजकीय फायदा शिवसेनेने उठवला. शिवसेनेचे चार मंत्री, तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरला भेटी दिल्या. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे, तर ठाण मांडूनच होते. प्रबळ विरोधकांची नावे फिर्यादीत आल्याने स्थानिक शिवसेना नेत्यांचा उत्साह द्विगुणित झाला. मात्र, त्यांचा हा उत्साह फार काळ टिकला नाही. आमदार संग्राम जगताप, शिवाजी कर्डिले, अरुण जगताप यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यात जोपर्यंत गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत जामीन न घेण्याची भूमिका याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार संग्राम जगताप यांनी घेतल्याने शिवसेनेच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.