शौचालयाच्या दाखल्यावरून ग्रामसेवकाला जीवे मारण्याची धमकी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासे तालुक्यातील भानस हिवरा येथील ग्रामसेवक रेवणनाथ भिसे यांना शौचालयाच्या दाखल्यावरून शिवीगाळ व दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या गावात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी झालेल्या प्रकाराबाबत नेवासा पोलिस स्टेशनला लेखी निवदनाद्वारे कळवले आहे. 

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सदर व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, असे तक्रारी अर्जात म्हटले आहे. सद्या भानस हिवरा ग्रामपंचायतची निवडणूक सुरू असल्याने ग्रामसेवक भिसे यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी तक्रारअर्जात केली आहे. यापूर्वी गावात महावितरणच्या खासगी कंत्राटी कर्मचाऱ्याला व सोसायटीच्या सचिव यांनाही या अगोदर मारहाण व शिवीगाळ करण्यात आली होती.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.