श्रीगोंदा तहसीलदारांची राजकीय दबाव झुगारून कारवाई.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावाच्या हद्दीत हंगा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याने श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन (माळी) यांचे पथक दि.१८ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गेले. हे पथक पाहून नदी पात्रातून जेसीबी गायब झाला. मात्र दोन वाळूच्या ट्रक पथकाने पकडल्या. त्या थेट बेलवंडी पोलिसात स्थानकात आणल्या. 

मात्र या ट्रक एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या असल्याने राजकीय यंत्रणा कामाला लागली. ही वाहने सोडावीत यासाठी प्रयत्न झाले. मात्र तहसीलदारांनी या ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. राजकीय पदाधिकारी आणि तहसीलदार यांची शाब्दिक चकमक घटनास्थळी झाली.

श्रीगोंदा तालुक्यात वाळूचा थेट संबंध राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी असल्याचे लपून राहिले नसल्याने. अवैध वाळूविरोधात कारवाई करताना महसूल यंत्रणेला अनेक वेळा राजकीय दबावाला सामोरे जावे लागत आहे. महसूल पथकाने कारवाई करूनही वाळूतस्करी बंद होत नसताना भीमा आणि घोड नदीच्या पात्र सोडून नवीन नवीन ठिकाणी वाळूउपसा सुरु आहे. यात महसूल पथकाला कारवाई नेमकी कुठे कुठे करावी असा प्रश्न असताना येळपणे येथे महसूलच्या पथकाला मात्र राजकीय दबाव असताना कारवाई करावे लागली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.