जिल्हाधिकारी द्विवेदींकडेच मनपाचा पदभार ठेवण्याची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महापालिकेच्या आयुक्तपदाचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आहे. राहुल द्विवेदी यांनी मनपाचा प्रभारी पदभार असताना देखील काही दिवसांत धडाकेबाज कामाला सुरूवात केली आहे. सीना नदीतील अतिक्रमणांचा विषय हात घातला आहे. महसूल वाढविण्यासाठी शास्ती माफीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, यापुढे शास्तीमाफी नाही, तर थेट जप्तीची कारवाई, असा इशारा त्यांना दिला आहे. 

Loading...
एकप्रकारे महापालिकेच्या कामकाजात काहीशी सुसूत्रता येऊ घातली आहे. त्यामुळे नगरकरांनी राहुल द्विवेदी यांच्याकडेच महापालिकाचा प्रभारी आयुक्तपदाचा पदभार काही दिवस राहू द्या, अशी मागणी करू लागले आहेत. . संजय गाडे, बाळासाहेब पवार यांची मागणी जागरूक मंचाचे सुहास मुळे यांनी सुरूवातीला या मागणीचे पत्र मुख्यमंर्त्यांना पाठविले होते. त्यानंतर स्थायीचे सभापती बाबासाहेब वाळके, विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय गाडे, बाळासाहेब पवार यांनीही ही मागणी लावून धरली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.