'आदिवासी'चे अनुदान लाटले ॲड.अभय आगरकरांविरुद्ध तक्रार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाचगनी (जि. सातारा, ता. महाबळेश्वर) येथील आदिवासी मुलांच्या नावे मिळणारे अनुदान लाटण्याचा आरोप नचिकेता एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टने केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरमधील ज्येष्ठ नते ॲड. अभय आगरकर यांचे नाव यात आल्याने खळबळ उडाली आहे. 


समाज माध्यमांवर तसे संदेश व्हायरल झाले आहेत. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचा खाजगी पीए महेश देवरा यांनी विद्यामाता एज्युकेशन ट्रस्टला हाताशी धरून हा प्रकार केल्याची तक्रारीत म्हटले आहे. ॲड. अभय आगरकर यांनी मात्र याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. नचिकेता एज्युकेशनचे आरोप फेटाळून लावले आहेत. सत्य सर्वश्रूत असते आणि ते मला माहित आहे. आपण कोणतेही अनुदान लाटलेले नाही. हे सत्य लवकरच समोर आणू, असे त्यांनी सांगितले. 

Loading...
नचिकेता एज्युकेशन व चॅरिटेलब ट्रस्टचे महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज आहे. या शाळेत ७३५ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांनी शासनाकडून मोठे अनुदान येते. प्रती विद्याथ्र्यामागे वर्षाला ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. विद्यार्थ्यांच्या जेवणाबरोबर मुलभूत सुविधा अंतर्भाव यात आहे. हे अनुदान शाळेच्या बॅंक खात्यात जमा होते.

नचिकेता ट्रस्टच्या संचालकांची आर्थिक परिस्थिती पाहता नगरचे ॲड. अभय आगरकर व प्रा. सुलतान दलेखा शेख यांच्या विद्यामाता एज्युकेशन ट्रस्टने मदतीचा प्रस्ताव मांडला. नचिकेताचे व्यवस्थापन हे विद्यामाताकडे देण्याचा कच्चा करार झाला. त्यानंतर आगरकर व शेख यांनी शाळेला न सांगताच तीन ऑक्टोबर २०१७ ला विद्यामाताच्या नावे एक कोटी ७५ लाख रुपायांचा धनादेश गेऊन १० ऑक्टोबर २०१७ रोजी रोकडा करण्यात आला. ही बाब नचिकेताच्या व्यवस्थापनाला समजल्यानंतर त्यांनी तशी तक्रार केली आहे. .

तीन ऑक्टोबर २०१७ रोजी पावणे दोन कोटी रोकडा केल्यानंतर आगरकर व शेख यांनी पीए महेश देवरा यांच्याशी संपर्क केला. सावरा यांच्या नावाच्या लेटरवर देवरा यांनी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना २२ जानेवारी २०१८ रोजी आदेश काढला. नचिकेता ट्रस्टला कोणतीही सूचना न देता विद्यामाता चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रोझलॅंड इंटरनॅशनल स्कुलला ट्रान्सरचे आदेशात म्हटले आहे. त्यानंतर नचिकेताच्या ट्रस्टीला ७३५ विद्यार्थ्यांचे अनुदान विद्यामाताला वळते करून ४ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला आहे. मंत्री सावरा यांच्या पीएने केलेल्या प्रकारामुळे हे अनुदान आगरकर ट्रस्टी असलेल्या रोझलॅंड शाळेला मिळाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.