शिर्डी नगरपंचायतच्या ॲन्टीचेंबरला आग.फर्निचर,फॅनसह इतर वस्तु जळुन खाक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी नगरपंचायतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहाच्या ॲन्टीचेंबरला शनिवार दि. १९ रोजी पहाटच्या सुमारास आग लागुन नुकसान झाले. सुदैवाने एक तासात आग विझविण्यास यश आले. अन्यथा मोठी हानी झाली असती. शॉर्टसर्कीटने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


काल सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान शिर्डी नगरपंचायतच्या तिसऱ्या मजल्या वरील मागील बाजुच्या खिडकीतुन धुराचे लोळ बाहेर पडत असल्याचे या ठिकाणच्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नगरपंचायतच्या अग्नीशामक दलास कळविले. अग्नीशामक विभागाचे अधिकारी विलास लासुरे व अशोक गांगुर्डे, विजय गायकवाड, प्रविण खरात, अशोक सोनवणे यांनी लागलीच या ठिकाणी धाव घेतली. 

Loading...
तिसऱ्या मजल्यावर सभागृहात पाहीले असता या ठिकाणी संपुर्ण धुरच धुर होता. संपुर्ण हॉल धुराने भरलेला असल्याने पुढे काही दिसत नव्हते. कर्मचारी सरपटत सरपटत आत गेले. एक तासानंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. ऑक्सीजन व मास्कची उणीव या कर्मचाऱ्यांना भासली. शॉर्टसर्कीटने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

 या आगीत ॲन्टी चेंबर मधील बैठक व्यवस्था, फॅनसह इतर वस्तु जळुन खाक झाल्या. सभागृहात आग फैलावण्यास वेळीच प्रतिबंध केल्याने मोठी हानी टळली. या मजल्यावर तसेच खालील मजल्यावर अनेक विभागांची कार्यालय आहेत. तसेच खालील मजल्यावर कार्यालयाच्या नुतणीकरणाचेही काम चालु आहे. लवकर आग आटोक्यात आली नसती तर मोठी वित्तहानी झाली असती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.