श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ,आदिक -ससाणेंमध्ये जोरदार खडाजंगी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बांधकामांच्या मंजुरीच्या फाईल नगराध्यक्षा त्यांच्या दालनात ठेवतात, या संजय फंड यांच्या आरोपावरुन नगराध्यक्षा अनुराधा आदिक संतापून त्यांना म्हणाल्या की तुम्ही गावाच्या टांगा स्टॅण्डच्या जागेवर अतिक्रमण करुन बांधकाम केलेले आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामा द्या. नगराध्यक्षा आदिकांच्या या वक्तव्यावर उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी आक्षेप घेतल्याने नगराध्यक्षा अनुराधा आदिक व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यात सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी झाली. 

नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी पार पडली. सभेच्या सुरूवातीस फंड यांनी बांधकाम फाईलीवरून नगराध्यक्ष आदिक यांना विचारणा केली. त्यावरून नगराध्यक्षा आदिक व फंड यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्यासह विरोधकांनी नगराध्यक्षांच्या आरोपावर जोरदार आक्षेप नोंदवत सभेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराने सत्ताधारी गटाला अखेर माघार घ्यावी लागली. रजेवर असलेले मुख्याधिकारी सुमंत मोरे यावेळी उपस्थित होते.सभेत प्रारंभीच माजी नगराध्यक्ष फंड यांनी आपल्या बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला दिला जात नसल्याचा आरोप केला.

Loading...
परवानगीची कागदपत्रे नगराध्यक्षा आदिक या स्वत:कडे ठेवतात. हा प्रकार गैर असल्याचे फंड म्हणाले. त्यावरूनच गदारोळ सुरू झाला. फंड यांच्या बांधकाम व्यवसायावरच वैयक्तिकपणे आरोप केले गेल्याने वाद पेटला. उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, मुक्तार शाह यांनी नगराध्यक्षांनी माफी मागावी अशी मागणी करत सभात्याग करण्याची भूमिका घेतली.एक महिला नगराध्यक्ष असताना विरोधकांकडून अनादर केला जातो. हे शोभते का ? असा सवाल नगराध्यक्षा आदिक यांनी केला. अखेर ज्येष्ठ नगरसेवक अंजूम शेख, शामलिंग शिंदे, राजेश अलघ, किरण लुणिया आदींनी मध्यस्थी करुन वादावर पडदा टाकला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.