सरकार खोटी आश्वासने देऊन धनगर समाजाची फसवणूक करतय !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :चौंडी येथे ३१ मे रोजी अहिल्यादेवी जयंतीनिमित्त बहुजन ऐेक्य परिषद मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यशवंत क्रांती सेनेचे अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्याच्या सरकारने खोटी आश्वासने देऊन धनगर समाजाची फसवणूक केली आहे. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे धनगर समाज आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेणार आहे.


धनगर लिंगायत असा वाद लावून प्रश्न प्रलंबित !
या वेळी यशवंत सेनेचे कोषाध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे, उपाध्यक्ष भगवानराव जऱ्हाड, मुख्य सल्लागार शफीक पारकर आदी उपस्थित होते. सध्याचे सरकार खोटी आश्वासने देऊन धनगर समाजाची फसवणूक करत आहे. २०१४ मध्ये बारामतीमध्ये समाजाच्या आंदोलनात पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे जाहिर केले. नागपूर येथे समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यानी सोलापूर विद्यापीठाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी असे जाहीर केले. परंतु कार्यवाही केले नाही. उलट धनगर लिंगायत असा वाद लावून प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. 

अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे बहुजन एकता परिषदेचा मेळावा.
आता मागण्यांसाठी धनगर समाजातील सर्व समाजातील सर्व संघटना या एक होऊन धनगर ऐेक्य़ परिषद स्थापन केली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित येत्या २० मे रोजी पंढरपूर येथे सत्ता संपादन निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी राज्यातून धनगर समाजाला एकत्र केले जाणार आहे. तर ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे बहुजन एकता परिषदेचा मेळावा होणार आहे. नागपूर येथील दीक्षाभूमीपासून ते चौंडीपर्यंत सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचा समावेश मेळाव्यात होईल, असे पडळकर यांनी जाहिर केले आहे. 

नगर जिल्ह्याचे विभाजन करून दक्षिण भागास अहिल्यानगर करावे.
याचबरोबर नगर जिल्ह्याचे विभाजन करून दक्षिण भागास अहिल्यानगर, नगरचे शहराचे आहे ते नाव कायम ठेवून, उत्तर भागास आंबेडकरनगर असे नाव दिले पाहिजे, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली. खेडमधील वाफगाव येथील महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ हे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यामुळे चौंडीला भाजपचे नेते येतात. त्यामुळे धनगर समाजाचा मेळावा हा भाजपचा कार्यक्रम झाला असल्याची टीका सेनेचे कोषाध्यक्ष भिसे यांनी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.