बसस्थानकावर पर्स चोरणाऱ्या महिलेला रंगेहाथ पकडले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : कामरगावहून शेवगावकडे प्रवासाला निघालेल्या प्रवासी महिलेची पर्स चोरताना माळीवाडा बसस्थानकावर रंगेहाथ पकडण्यात आले. कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, चोरी करणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे. कावेरी विलास चव्हाण (वय-21) राहणार चितेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद, असे या महिला चोराचे नाव आहे.
याबाबत हकीगत अशी की, शकुंतला विलास ठोकळ (वय-43), राहणार कामरगाव या आपल्या पतीसोबत दुपारी 2 च्या सुमारास शेवगावला जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानकात आल्या होत्या. सध्या लग्नसराई व सुट्ट्यांचे दिवस असल्याने बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन शेवगावकडे निघालेल्या शकुंतला ठोकळ यांची पर्स लांबविण्याचा प्रयत्न कावेरी चव्हाण हिने केला. 

Loading...
माळीवाडा बसस्थानकातील पोलीस चौकीतील सहायक फौजदार हरीश पाटे यांनी पोलीस चौकीत कावेरी चव्हाण हिला पोलीस चौकीत आणले. यावेळी पोलिसी खाक्‍या दाखविताच या महिलेकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाटे यांच्या सोबत पोलीस कॉन्स्टेबल घोगांते यांनी बऱ्याच वेळ या महिलेची कसून चौकशी केली. त्यानंतर कावेरी विलास चव्हाण हिच्यावर शकुंतला ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, कावेरी चव्हाण हिला अटक करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.