अहमदनगर - पुणे महामार्गावर अपघात, स्कॉर्पिओवर कंटेनर पलटी झाल्याने दोघे ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर - पुणे महामार्गावर चास शिवारात शनिवारी रात्री झालेल्या अपघात दोघे ठार झाले. वळणावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडल्याने हा अपघात झाला. दुस-या बाजूने येणा-या स्कॉर्पिओवर कंटेनर पलटी झाल्याने हा अपघात झाला.

Loading...
कंटेनर पुण्याकडून नगरच्या दिशेने येत होता. तर स्कार्पिओ नगरहून- पुण्याचे दिशेने चालली होती. मात्र दुभाजक ओलांडून कंटेनर स्कॉर्पिओवर पलटी झाला. या अपघातात सिंधूबाई गायकवाड( बारामती) या ठार झाल्या. तर कंटेनरचा क्लिनरसह एकाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे पुणे महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली होती. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.