निवडणुकीच्या वादातून निंबोडीत दोन गटात हाणामारी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील निंबोडी येथे निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निंबोडी येथील दीपक केरू ससाणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आपण गुरूवारी रात्री ८ च्या सुमारास मोबाईल चार्जिंगसाठी निंबोडी गावातील लक्ष्मीनगर येथे जात होतो. यावेळी श्रीपाद शिवाजी शेंडगे, खंडू श्रीपाद शेंडगे, संतोष श्रीपाद शेंडगे हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत विटा फेकून मारल्या असल्याचे ससाणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पांडूरंग शेंडगे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुल शेंडगे, सुरेश सावळे, विवेक थोरात, दीपक ससाणे शिवीगाळ करून मारहाण केली.
Loading...

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.