तहसील पथकावर वाळू तस्करांचा हल्ला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : तहसीलच्या पथकावर वाळू तस्कराकडून राहाता तालुक्यातील  शिंगव्यात हल्ला करण्यात आला. एका कर्मचाऱ्याच्या खिशातील रोख रक्कम व सोन्याची अंगठीही हल्लेखोरांनी पळवली. तसेच पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी राहाता पोलीसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शनिवारी सकाळी ८. ३० वाजेच्या सुमारास शिंगवे (ता राहाता) येथे ही घटना घडली. 



गोदावरी नदीतून होणारी बेसूमार वाळू चोरी रोखण्यासाठी राहाता तहसीलदारांच्या आदेशाने पथके तैनात करण्यात आली आहे. शिंगवे तलाठी दिलीप कुसळकर, अस्तगांव तलाठी हरीप्रसाद माळी, कारकून शुक्लेश्वर इजगे, लिपिक पोकळे आदी गस्त घालत असताना वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर जात असताना दिसले ते अडवून ताब्यात घेऊन तहसील कडे नेत असताना १५ ते २० जणांनी ट्रॅक्टर अडवून सरकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. मच्छिंद्र पोकळे यांना धरून खिशातील ११०० रूपये रोख व हातातील ६००० हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली. तसेच पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व वाळूचे भरलेले ट्रॅक्टर पळवून नेले. 

Loading...
या घटनेची माहीती मिळताच तहसिलदार माणिकराव आहेर, नायब तहसिलदार राहुल कोताडे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा पाठलाग केला, मात्र ते पळून गेले. एका आरोपीची मोटारसायकल ताब्यात मिळाली. या प्रकरणी शिंगव्याचे तलाठी दिलीप कुसळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर रामचंद्र दुशींग, संदिप माधव पवार, भाऊसाहेब कोंडाजी वाडगे यांच्यासह १० ते १२ जणांवर राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, तालुक्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी महसुल विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. यापुढे धडक मोहीम राबवून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळू, असा इशारा तहसिलदार माणिकराव आहेर यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.