बाळासाहेब पवार आत्महत्या ; आरोपी सावकारांच्या घराची झडती घेऊन पंचनामा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : ओम उद्योग समुहाचे बाळासाहेब पवार यांनी आरोपींनी व्याजाच्या पैशाकरिता त्रास दिल्याने आत्महत्या केली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यात यशवंत कदम (रा. अहमदनगर), विनायक रणसिंग (रा. रेल्वे स्टेशन) अहमदनगर व जी. जी. कटारिया या आरोपींच्या घराची झडती घेऊन पंचनामे करण्यात आले. 

Loading...
उपनिबंधक सहकारी संस्था, नगर तालुका या कार्यालयातील पथकामार्फत आरोपीच्या घराची घरझडती घेऊन पंचनामे करण्यात आले. यावेळी सापडलेली दस्तऐवज, साठेखत, खरेदीखते इत्यादी आक्षेपार्ह कागदपत्रे कोतवाली पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आली आहेत. 

स्थळ झडती, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे व नगर तालुक्याचे सहाय्यक निबंधक राम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली, असे सावकाराचे सहाय्यक निबंधक राम कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.