'सत्तेतून बाहेर पडण्याबाबत बोलण्याचे शिवसेनेने द्विशतक केले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : 'कर्नाटकमधील आजच्या घटनेवरून देशात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येते. हा लोकशाहीचा विजय असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन होईल, राज्यात सुद्धा सर्व विरोधीपक्ष एकत्र येऊन परिवर्तन घडवतील,' अशी प्रतिक्रिया विधान सभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

कर्नाटकमधील ताज्या घडामोडींवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, 'कर्नाटकात लोकशाहीची हत्या होताहोता वाचली. येथे अल्पकाळात भाजपाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. सत्ता-संपत्तीच्या जोरावर काहीही करू शकतो, ही जी धारण भाजपाच्या नेत्यांमध्ये होती, तिला मोठी चपराक बसली आहे.

Loading...
'शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ''
सत्तेतून बाहेर पडण्याबाबत बोलण्याचे शिवसेनेने द्विशतक केले असून शिवसेनेने शतकाच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला सुद्धा मागे टाकले आहे. शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशातच आहेत, तर ते पावसात फाटले की खिशातून बाहेर पडायला तयार नाहीत,' असे सांगून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले 'सरकारच्या विरोधात भूमिका मांडत राहायचे, आणि सरकारकडून अधिकाधिक सत्तेचा कसा वाटा मिळेल, हे पाहायचे, अशी शिवसेनेची भूमिका आहे.'


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.