संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर आता ‘सीआयडी’च्या रडारवर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळे आता माजी महापौर संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे.खुनापूर्वी भानुदास कोतकर याचे सून सुवर्णा कोतकर हिच्यासोबत बोलणे झाले होते. मात्र, सासरेच नव्हे, तर पती संदीप कोतकर याच्याशी मोबाईलवरून संभाषण झाले होते. त्याला मोबाईल व सीमकार्ड कसे पुरविण्यात आले, हेही चौकशीतून पुढे आल्याचे समजते. 

Loading...
संदीप कोतकर हा कारागृहात असतानाच मोबाईल संभाषण झाल्याने तेथील अधिकारी व कर्मचारीही संशयाच्या फेर्‍यात अडकणार आहेत. पोलिसांनी ही बाब चव्हाट्यावर येऊ दिलेली नव्हती. हा प्रकार रेकॉर्डवर आलेला असल्याने संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य आता ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोतकर कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.