अपघातग्रस्त ट्रकमधील ३० लाख रुपयांचे दारूचे बॉक्स पळविले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोल्हार घोटी राज्यमार्गावर निमगावजाळी शिवारात दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अपघात झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी ट्रकमधील दारूचे बॉक्स पळवून नेले. सुमारे ३० लाख रुपयांचे ४३६ बॉक्स चोरी गेल्याचे सांगण्यात आले.

Loading...
बारामती येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीची मालट्रक विदेशी दारूचे बॉक्स घेऊन नाशिककडे निघाला होता. निमगावजाळीजवळ एका वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी झाला. त्यामुळे त्यातील दारूचे बॉक्स बाहेर पडले. त्यातील काही फुटले, तर काही ग्रामस्थांनी पळवून नेले.त्यानंतर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आले. त्यांनी पंचनामा करून उरलेले बॉक्स दुसऱ्या वाहनातून पुढे पाठवून देण्यास मदत केली. या घटनेत बाटल्या फुटल्याने तसेच बघ्यांनी पळवल्याने सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.