व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून काढल्याच्या रागातून खुनी हल्ला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून काढल्याच्या रागातून युवकावर सशस्त्र खुनी हल्ला करण्यात आला. यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नगर-मनमाड रस्त्यावरील विळद शिवारातील विखे पाटील हॉस्पिटलसमोरील मेजवानी मेसवर गुरुवारी रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी अमोल गडाख, सचिन गडाख (दोघे रा. सोनई, ता. नेवासा) व इतर दोन साथीदार अशा चौघांविरुद्ध संगनमताने खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत चैतन्य शिवाजी भोर (वय 18, रा. वळती, ता. आंबेगाव, जि. पुणे, हल्ली रा. माळकुप, ता. पारनेर) हे जखमी झाले आहेत.
Loading...

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री भोर हे त्यांच्या मित्रांसमवेत मेजवानी मेसवर बसले होते. त्यावेळी सचिन गडाख याच्या सांगण्यावरून अमोल गडाख व त्याच्या दोन साथीदारांनी व्हॉट्स अप ग्रुपवरून काढल्याची विचारणा करून धक्काबुक्की व शिवीगाळ केली. अमोल गडाख याने धारदार हत्याराने भोर यांचे पोट, तोंड व पाठीवर सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी युवक चैतन्य भोर यांना तातडीने हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.