केडगाव हत्याकांडाचे रहस्य उलगडण्याआधीच भानुदास कोतकर न्यायालयीन कोठडीत !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगाव हत्याकांडाचे रहस्य उलगडण्याआधीच भानुदास कोतकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे कोतकरची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.केडगाव हत्याकांडापूर्वी केडगाव येथे कोतकरच्या घरी सुवर्णा कोतकर यांच्या उपस्थित एक बैठक झाली होती. याच बैठकीतून सुवर्णा यांनी भानुदास कोतकर याला फोन केला होता. यावेळी कोतकर याने सुवर्णा यांना काय सल्ला दिला होता. याची तपासी यंत्रणेला उत्सुकता होती.
Loading...
कोतकर याला विशेष पथकाने येरवडा पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी आला असता १४ मे रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. शनिवारी न्यायालयात सरकारी पक्षाने कोतकरला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. आरोपी पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. कोतकर याच्यावर केडगाव हत्याकांडाचा कट रचल्याचा आरोप आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.