व्यापाऱ्याला ३ लाखांची मागितली खंडणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बुरुडगाव परिसरात जागेबाबत न्यायालयात दावा सुरू असताना सदर जागेवर जाण्यास मनाई असताना बेकायदेशिररित्या जागेत जावून या जागेशी संबंधित व्यापाऱ्यास तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुरुडगाव रोडवर पारनेर येथील व्यापारी पवन रसिकलाल कटारिया (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) यांची सदर परिसरात जागा असून या जागेबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर जागेस जाण्यास मनाई असताना छिंदमबाई नारायण चव्हाण, शास्त्रीबाई छोट्या काळे, खुम्र्या दादा चव्हाण यांनी अनाधिकृतरित्या संबंधित जागेवर कब्जा करण्याची धमकी देत कटारिया यांना तीन लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी कटारिया यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोसई बोडखे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.