श्रीरामपुरात वॉचमनला बांधून ठेवत पाच लाखांचा दरोडा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालयाशेजारी राहणाऱ्या ए. पी. शाह यांच्या बंगल्याच्या पहारेकऱ्याला तोंडात बोळा कोंबत बांधून ठेवून व घरातील महिलेचे हातपाय धरून मारहाण करत सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला. 



ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घटली. सुमारे दीड तास चोरट्यांचा धुमाकूळ सुरू होता.. शहरातील बोरावके महाविद्यालयामागे स्वामी विवेकानंद गृह निर्माण संस्थेत शाह यांचा बंगला आहे. गुरुवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून पाच चोरट्यांनी आत प्रवेश केला.

शाह हे बाहेरगावी गेलेले होते. त्यांच्या पत्नी भारती, नातू व सून घरात झोपलेल्या होत्या. पहारेकरी भागवत चव्हाण (रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर) हे घराबाहेर झोपलेले होते. चोरट्यांनी त्यांच्या तोंडात बोळा कोंबला त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर चोरट्यांनी घरात प्रवेश करताच आवाजामुळे भारती जाग्या झाल्या. दोन चोरांनी त्यांचे हात व पाय धरून ठेवले.

त्यानंतर उचकापाचक करत कपाटातील सोने व रोख रक्कम मिळून सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास केला. पहारेकरी चव्हाण यांनी चार ते पाच चोर असल्याचे सांगितले. आरडाओरडा करू नये म्हणून त्यांना दोन चोरट्यांनी धाक दाखविला.

घरातील कपाटाची व सामानाची उचकापाचक केली. यापेक्षाही अधिक ऐवज चोरीस गेला असण्याची शक्यता आहे. अशोक शाह आल्यानंतरच चोरीचा तपशील स्पष्ट होणार आहे. . शहर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.