विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू -आ. शिवाजी कर्डिले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह गावातील मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे महिला बचतगटास कर्जवितरण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी आ. कर्डिले बोलत होते. 


माजी सरपंच गणपत पेरणे, उपसरपंच इंद्रभान पेरणे, सेवा संस्थेचे अध्यक्ष गहिनीनाथ पेरणे, ग्रामपंचायत सदस्य रामराव पेरणे, बाळासाहेब धसाळ, माजी उपसरपंच आशा खडके, बचतगटाच्या अध्यक्षा व ग्रामपंचायत सदस्य स्वाती धसाळ आदी उपस्थित होते.

आ. कर्डिले म्हणाले, महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी संघटित होऊन उद्योग व्यवसायात चांगली वाटचाल करावी. तांदुळवाडी गावात रस्ते, हायमॅक्स दिवे, ग्रंथालयाची इमारत, सभामंडप आदी कामांसाठी वेळोवेळी निधी दिला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठीदेखील प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. स्वाती धसाळ म्हणाल्या, ग्रामपंचायात सदस्य म्हणून काम करताना बचतगटाची स्थापना करून महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठक्ष आमचा प्रयत्न आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.