अपघातातील जखमींना मदतीसाठी मध्यस्थी करणार्या एकाचा खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे अपघातातील जखमींना मदतीसाठी मध्यस्थी केली, म्हणून एकाचा घातपात करून विहिरीच्या पाण्यात टाकून खून करण्यात आला. याप्रकरणी कुकाणे येथील चौघांविरुध्द नेवासे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.



मृताची पत्नी मीराबाई सुरेश बोरुडे यांनी तक्रारीत म्हटले, माझे पती सुरेश विश्वनाथ बोरुडे (४७, शहर टाकळी) हे २७ एप्रिलपासून बेपत्ता होते. २९ ला त्यांचा मृतदेह कुकाणे (ता. नेवासे) येथील अनिल विधाटे यांच्या विहिरीत आढळला. कुकाणे येथील ज्ञानेश्वर कैलास रामगुडे यांच्याकडून ७-८ महिन्यांपूर्वी अपघात झाला होता.

या अपघातातील जखमींना मदतीसाठी माझ्या पतीने मध्यस्थी केली होती. त्यावरून ज्ञानेश्वर रामगुडे व सुरेश बोरुडे यांची फोनवर, तसेच समोरासमोर वादावादी होत असे. ज्ञानेश्वर कैलास रामगुडे, कैलास चिमाजी रामगुडे, लहानुबाई कैलास रामगुडे, गणेश कैलास रामगुडे (सर्व कुकाणे) यांनी घातपात करून संगनमताने आपल्या पतीला विहिरीच्या पाण्यात टाकून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून नेवासे पोलिसांनी चौघांविरुध्द भादंवि कलम ३०२, २०१, ३४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.