आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या काष्टीतील दहा सट्टेबाज बुकींना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या काष्टी येथील दहा सट्टेबाज बुकींना काल दि.१७ गुरुवार रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यानुसार श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की, काष्टी येथील काही व्यावसायिक व इतर काही लोक मिळून क्रिकेट सामन्यावर मोठ्याप्रमाणात सट्टा लावत होते. कोणती क्रिकेट टीम जिंकणार, कोणती हरणार, कोणता खेळाडु चांगला खेळणार, चौकार,षटकार कोण मारणार या सर्व क्रिकेट मधल्या खेळावर हे काष्टीतील सट्टेबाज बेटिंग करत होते. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत होती.

अनेक दिवसांपासून हा प्रकार काष्टीत सुरू होता. परंतु दि. १७ गुरुवारी श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना गुप्त बातमीदारामार्फत काष्टी गावातील तुळसाई नगर येथील महालक्ष्मी ठिबक सिंचन दुकानाच्या गाळा क्र एक व दोन मध्ये काही ईसम सध्या सुरू असलेल्या आईपीएल सामन्यांवर मोबाईलवरून बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिस निरीक्षक पोवार यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी पो कॉ उत्तम राऊत, पो कॉ दादा टाके,पो कॉ.किरण बोऱ्हाडे, म्हेत्रे यांना सदर ठिकाणी पाठवले. या पोलीस पथकाने बेटिंग चालू असलेल्या काष्टी येथील तुळसाई नगरमधील महालक्ष्मी ठिबक सिंचनाच्या गाळ क्र.एक व दोन मध्ये छापा टाकला असता. त्याठिकाणी काही सट्टेबाज हे आईपीएल सामन्यावर बुकिंग घेऊन सट्टा लावत असल्याचे निष्पन्न झाले.

या पोलीस पथकाने सट्टा लावणारे बुकी महेश निवृत्ती गावडे, लिंबाजी भीमराव बल्लाळ, सूरज नानासाहेब राहिंज, शाहारुख इस्माईल जकाते, मल्हारी किसन राहिंज, सागर अशोकराव पाचपुते, पप्पु कैलास राहिंज, नेहाल मेहबूब सय्यद, बाळासाहेब साहेबराव कव्हाणे, देविदास गोपीनाथ भिंताडे सर्व रा.काष्टी या दहाजणांना सट्टा लावण्याच्या साहित्यासह ३३,००० रुपये किंमतीचे नऊ मोबाईल व ३९,०००रुपये रोख असा ऐकूण ७२,०००रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. पो कॉ उत्तम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या सर्व दहा जणांविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.