कोतवाली पोलिस ठाण्याजवळ महिलेचा खुनाचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोतवाली पोलिस ठाण्याजवळील माणिक चौक परिसरात वादाच्या जागेत घराचे बांधकाम सुरु केलेल्यांना जाब विचारला असता महिलेस शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि.१४) दुपारी १२ वा.च्या दरम्यान घडली आहे. 

या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन चौघा जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अल्यास शेख साजिद मुन्सी (रा. नालेगाव) यांचा वडिलोपार्जित घरावरुन वाद सुरु असून, माणिक चौक येथे येवून वादाच्या जागेत बांधकाम का सुरु केले ? असे त्यांनी विचारले असता फैसर शाहरुख शेख, आफरिन फैसर शेख, फरहान शाहरुख शेख, सायरा समशेर शेख (सर्व रा. आदर्शनगर शाळेमागे, माणिक चौक)यांनी महिलेस लाथा-बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच फैसर शेख यांनी त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोसई. नयन पाटील हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.