कर्जत मध्ये इलेक्ट्रॉनिक व फर्निचर मॉलला लागलेल्या आगीत ७५ लाखांचे नुकसान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यात फर्निचरसाठी प्रसिध्द असलेल्या राशीन येथील रसिक इलेक्ट्रॉनिक व फर्निचर मॉलला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून अंदाजे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या मालला लागलेल्या आगीवर ग्रामस्थांनी अथक परिश्रमांनी नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणात वस्तुंचे नुकसान झाले होते.


राशीन-करमाळा मार्गालगत असलेल्या रसिक इलेक्ट्रॉनिक व फर्निचर मॉलला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे गुरूवारी रात्री १० च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. या मॉलचा प्रथमदर्शनीचा भाग आगीत पूर्णपणे जळुन खाक झाला. या अग्नितांडवामध्ये मॉलच्या शेजारी राहणाऱ्या साळवे कॉलनीतील व परिसरातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी दाखवलेल्या प्रसगंवधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

मॉलला लागलेल्या आगीत इलेक्ट्रॉनिक वस्तुंसह किमंती फर्निचर जळुन मॉलचे सुमारे ७५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मॉलचे संचालक नवीन बोरा यांनी दिली.. दरम्यान रात्री विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग वाऱ्यामुळे काही क्षणातच पसरत गेली. आग विझवण्यासाठी अंबालिका साखर कारखाना व भैरवनाथ शुगर यांच्या मालकीचे अग्निशामक बंब बोलविण्यात आले.

 मात्र बंब येईपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे तासभर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी काही तरूणांनी गॅस कटरच्या साह्याने मुख्य शटर उघडले व आतील आग विझवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी अग्निशामकची वाहने येईपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केल्याने आग जास्त पसरली नाही. व वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.