नेवासा तालुक्यातील धनगरवाडीत पाण्यावरून तुफान हाणामारी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील धनगरवाडी येथे पाण्याच्या वादातून भाऊबंदामध्येच तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत. तर ६ जणांविरूद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गंगाधर धुराजी वाल्हेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तालुक्यातील धनगरवाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या कारणावरून महिलांमध्ये अगोदर भांडणे झाली होती. याच कारणावरून वाल्हेकर भाऊबंदामध्येच तुफान हाणामारी झाली. यामध्ये धमेंद्र सीताराम वाल्हेकर, सीताराम सखाराम वाल्हेकर, सतीश सीताराम वाल्हेकर, पारूबाई सीताराम वाल्हेकर, योगिता धर्मा वाल्हेकर (सर्व रा. धनगरवाडी) व दत्तू धानापूणे (रा. माळीचिंचोरा) यांनी लोखंडी गज, धारदार हत्यार आदींनी जोरदार मारहाण केली.

यामध्ये मनिषा गंगाधर वाल्हेकर, गंगाधर वाल्हेकर, बाबुराव वाल्हेकर हे तिघेजण जखमी झाले आहेत. या भांडणात आरोपींनी मनिषा वाल्हेकर यांच्या हाताला चावा घेवून अंगावरील दागिने ओरबडले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. . याप्रकरणी नेवासा पोलिसांत ६ जणांसह इतर अनोळखी ४ ते ५ जणांविरूद्ध भा.दं.वि. ३२४, ३२७ अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. के. मरकड पुढील तपास करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.