माजी आमदार अनिल राठोड, संभाजी कदम फरारच !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दगडफेक प्रकरणी काल शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक दिलीप सातपुते नगरसेवक विक्रम राठोड, युवा सेनेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन कोतकर यांच्यासह 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांसमोर काढलेल्या छायाचित्रात असलेले व पोलिस डायरीत फरार असलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम अद्याप फरारच आहेत. राठोड,कदम यांच्यावर गुन्हा दाखल असूनही वरिष्ठ पोलिस अधीकारी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात.पोलिसांनीही यांना अटक करण्याची हिंमत अद्याप दाखवलेली नाही.

७ एप्रिल रोजी पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केडगाव शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलिस व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांवर गुन्हे दाखल केले होते. या तोडफोड प्रकरणी ७ मे रोजी ९ शिवसैनिक स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाले होते.

 १० मे रोजी आणखी सात जणांना अटक करण्यात आली होती. १४ मे रोजी शिवसैनिक मदन आढाव व रवी वाकळे हे पोलिस ठाण्यात हजर झाले होते. शुक्रवारी या दगडफेकप्रकरणी स्वत:हून हजर झालेले शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड, दीपक खैरे, हर्षवर्धन कोतकर, रमेश परतानी, सुनील सातपुते, देविदास मोढवे, मुकेश जोशी,विजय पठारे, चेतन फसले, चेतन शर्मा, विशाल गायकवाड, शुभम बेंद्रे, अनिल लालबोंद्रे, लंकेश हरबा यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.