कचरा जाळण्याचे प्रकार थांबवा अन्यथा कारवाई : महापौर कदम

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर महानगरपालिका शहर व उपनगरामध्ये बऱ्याच ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार वारंवार दिसून येत आहे. वृत्तपत्रामधून देखील कचरा जाळण्याचे प्रकार प्रसिद्ध होत आहेत. याबाबत महापौर सौ. सुरेखाताई कदम यांनी बैठक घेतली. 


या बैठकीस उपमहापौर अनिल बोरुडे, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, सभागृह नेते गणेश कवडे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ. सारिकाताई भुतकर व उपसभापती सौ. सुनिताताई मुदगल, माजी महापौर भगवान फुलसौंदर, गटनेता संजय शेंडगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे, आरोग्याधिकारी डॉ. पैठणकर, मुख्य लेखापरिक्षक श्री. खरात, प्र. मुख्यलेखा अधिकारी श्री. गांधी, प्रभाग अधिकारी नाना गोसावी तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर म्हणाल्या की, कचरा जाळण्याचे प्रकार सुरु असून याबाबत वैद्यकीय आरोग्याधिकारी व आरोग्याधिकारी, सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी व्यक्तीश: लक्ष घालून कचरा उचलण्याबाबतची कार्यवाही सर्व प्रभागात कटाक्षाने करण्याचे आदेश दिले. तसेच शहरात व उपनगरात अनेक ठिकाणी कचरा जाण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत.

यावर सर्व स्वच्छता निरीक्षकांनी लक्ष देवून कचरा जाळलला जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच जे नारिक कचरा जाळताना दिसतील त्यांना कचरा न जाळण्याबाबत समज देण्यात यावी. यापुढे शहर व उपनगरात अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल असे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.