शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. भाऊसाहेब हरी मोरे (वय-५०) हे आपल्या शेता नजीक असलेल्या यशवंत शंकर मोरे यांच्या शेतात शेततळ्यावर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. शेततळ्यातील मोटर चालू करत असताना पाय घसरून ते पडले.
शेततळ्यात प्लॅस्टिकचा कागद असल्याने त्यांना वर येता आले नाही. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांनी दिली. उपसरपंच बाळासाहेब लांडगे यांनी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळवली. शेततळ्यातून मृतदेह काढून पंचनामा करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.