श्रीगोंदा शहरातील कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यात लेंडीनाला पर्यावरण संवर्धन व नाना-नानी पार्कसाठी सुमारे 6 कोटींच्या कामाला अंतिम मान्यता देण्यात आली. महात्मा फुले उद्यानशेजारी 1 कोटी 6 लाख रुपये खर्चून खेळाचे मैदान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दिली.


पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी मनोहर पोटे होते. उपनगराध्यक्ष अर्चना राजू गोरे, नगरसेवक नानासाहेब कोथिंबिरे, अशोक खेंडके, सुनीता शिंदे, छाया गोरे, अख्तर शेख, दादा औटी, संगीता मखरे, सुनील वाळके, वैशाली आळेकर, संगीता खेतमाळीस, गणेश भोस आदी नगरसेवकांनी चर्चेत भाग घेऊन कामांमध्ये दुरुस्त्या सूचविल्या. 

प्रशासकीय बाबींसंदर्भात मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी उत्तरे दिली. शहरासाठी आलेला कोट्यवधींचा निधी दर्जेदार कामांद्वारे वापरण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष पोटे यांनी या वेळी दिली.शहराच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या लेंडीनाला सरोवर विकास योजनेत सुमारे 6 कोटी रुपये खर्चून नाना-नानी पार्क उभारण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.