....तर तनपुरे सहकारी साखर कारखाण्याचे आठ कामगार जीवनयात्रा संपविणार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कामागार न्यायालयाने मंजूर केलेल्या रकमा मिळण्यासाठी राहुरीच्या डॉ बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाण्याच्या आठ निवृत्त कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 16 ते 18 मे असे दोन दिवसाचे उपोषण सुरु केले आहे न्याय न मिळाल्यास 19 मे रोजी जीवनयात्रा संपविणार आसल्याचा इशारा या निवृत्त कामगारांनी निवेदनात दिला आहे.


या उपोषण अंदोलनात सावळेराम पांडुरंग भुजाडी, सोन्याबापू जनार्दन सागर, आसाराम नामदेव साळवे, सूर्यकांत बाबुराव कोरडे, बन्सी कोंडाजी गाडे, गोविंद पांडुरंग काळे, चांगदेव जगन्नाथ वाळुंज आणी प्रभू तुकाराम पानसंबळ या आठ जणांचा समावेश आहे.

पाठपुरावा करुनही हक्काची रक्कम मिळाली नाही. 
राहुरी कारखान्याच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आम्हाला हक्काच्या देय रकमा मिळाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही अहमदनगर कामगार न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने व्याजासह रकमा मंजूर केल्या. मात्र वेळोवेळी पाठपुरावा करुनही आम्हाला आमच्या हक्काची रक्कम मिळाली नाही. आम्ही सर्वजण ज्येष्ठ नागरिक असून आम्हास चरितार्थासाठी व नियमित औषधोपचारासाठी नादार झालो आहोत. त्यामुळे घरी मरणासन्न जगण्यापेक्षा न्याय मागण्यासाठी आम्ही आपल्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.