....आता अनिल राठोडांना अटक कधी ? जिल्ह्याचे लक्ष केंद्रित .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दगडफेक प्रकरणी आज शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक दिलीप सातपुते नगरसेवक विक्रम राठोड, युवा सेनेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन कोतकर यांच्यासह 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पण शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांना अटक केव्हा होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 


शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल असूनही वरिष्ठ पोलिस अिधकारी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. याच राठोड यांना मात्र तत्कालीन पोलस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली होती. राठोड यांनी अतीक्रमणे हटवण्यास विरोध केला होता. केडगाव दगडफेक प्रकरणी कृष्णप्रकाश यांच्यासारखी खमकी भूमिका घेत आताचे पोलिस राठोड यांना अटक करण्याचे धाडस करतील का? अशी चर्चा शहरात सुरु आहे.

केडगाव हत्याकांडानंतर शिवसेनेचे नेते व पदाधिकाऱ्यांनी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या मृतदेहाजवळ येण्यास पोलिसांना मज्जाव केला होता. आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करीत रास्ता रोको करीत वाहनांची मोडतोड, दगडफेक केली. त्यात पोलिसांच्या गाडीचेही नुकसान झाले. या प्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. नंतर मात्र संबंधितांना पोलिसांनी अटक केली नव्हती. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.