आई-वडिलांचे समाधान हाच जगातील सर्वोच्च पुरस्कार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती संभाजी महाराज भोसले यांची जयंती मोठ्या उत्साहात वरूर ता.शेवगाव जि.अहमदनगर या ठिकाणी पार पडली. या जयंतीनिमित्त आदल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते.सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सर्व तरुण मंडळाच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर जयंतीच्या दिवशी सकाळी रक्तदान ठेवण्यात आले होते.या रक्तदानाचे उदघाटन श्री.सुधीर कंठाळी सर यांच्या हस्ते करण्यात आले.


या रक्तदानासाठी भर उन्हामध्ये ४५ युवकांनी रक्तदान केले.यामध्ये वरूर गावातील तरुणांसह शेवगाव, भगूर, फलकेवाडी,ढोरजळगाव या गावातून आलेले युवक सहभागी झाले होते. सायंकाळी महाराजांची मिरवणूक काढुन शिवशाहीर अक्षय डांगरे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर श्री. निलेशजी मोरे सर यांचं ज्वलज्वलनतेजस संभाजी राजा या विषयांवर व्याख्यान झाले. 

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डी.डी.गवारे साहेब(अप्पर पोलीस अधीक्षक)किसनराव माने सर,सागर फडके,भगूरचे सरपंच वैभव पुरनाळे,सुनील काकडे सर,उमेश भालसिंग,किशोर म्हस्के उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन म्हस्के सूत्रसंचालन भागवत म्हस्के यांनी आभार प्रदर्शन गणेश म्हस्के यांनी केले. 

तर कार्यक्रम यशस्वीपणे पारपाडण्यासाठी सचिन म्हस्के,ओंकार भुजबळ,रवी मोरे,निलेश मोरे,बाळासाहेब धायतडक,अनिल वावरे,भाऊसाहेब पाचरणे,अमोल ढाळे,सचिन कदम,गणेश वावरे,गणेश म्हस्के,ज्ञानेश्वर म्हस्के,अजिनाथ हातमोडे,विकी खैरे,बाळू खैरे,संतोष खडके, अक्षय डांगरे,रवींद्र म्हस्के,विकास म्हस्के,ज्ञानेश्वर तावरे,लक्ष्मण म्हस्के, रितेश ढाळे,पप्पू रेवडकर,अशोक शेळके,भागवत म्हस्के,राहुल खांबट,आदी तरुण मंडळीनी सहकार्य केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.