नगरसेवक विक्रम राठोड,दिलीप सातपुतेसह १६ शिवसैनिक अटकेत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दगडफेक प्रकरणातील गुन्ह्यात शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक दिलीप सातपुते, नगरसेवक विक्रम राठोड, युवा सेनेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन कोतकर यांच्यासह १६ शिवसैनिक कोतवाली पोलिसांना शरण आले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.


महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शनिवार दि. ७ एप्रिल रोजी दुहेरी हत्याकांड झाले. त्यामध्ये संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याचे केडगावमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. यावेळी जमावाने पोलिसांच्या वाहनांवर थेट दगडफेक करुन नगर-पुणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.